धनगर समाजाला ‘एसटी’त आरक्षण नाहीच, ‘टीस’चा अहवाल आरक्षणाच्या विरोधात !

धनगर समाजाला ‘एसटी’त आरक्षण नाहीच, ‘टीस’चा अहवाल आरक्षणाच्या विरोधात !

मुंबई  धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीत आरक्षण मिळणं कठीण झालं असल्याचं दिसत आहे. कारण ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (टीस) या संस्थेनं अहवाल दिला असून यामध्ये ‘धनगर’ व ‘धनगड’ या दोन्ही भिन्न जाती असल्याचं म्हटलं आहे. टीसचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण दिलं जाणार होतं.परंतु ‘टीस’चा अहवाल धनगर समाजाच्या विरोधात गेला असल्यामुळे धनगर समाजाचे एसटी आरक्षण कठीण बनले आहे. या अहवालामुळे सरकारनं धनगर समाजाला आरक्षणाचं फक्त गाजरच दाखवलं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आदिवासी विकास विभागाने हा अहवाल महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असल्याची माहिती आहे. धनगर आणि अन्य राज्यांतील धनगड या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत. त्यामध्ये समानता नसल्याचं ‘टिस’च्या अहवालात म्हटले आहे. यामुळे धनगरांना आरक्षण देण्यात राज्य सरकारला अडथळा निर्माण झाला असून नकारात्मक अहवालामुळे हा अहवालच राज्य सरकारने बासनात बांधून ठेवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

आरक्षणाच्या लाटेचा फायदा घेऊन राम शिंदे, महादेव जानकर आणि डॉ. विकास महात्मे हे खासदार झाले. या धनगर नेत्यांनीही ‘टीस’च्या अहवालानंतर आरक्षण मिळेल अशी वक्तव्य अनेकवेळा केली होती. परंतु ‘टीस’चा अहवाल धनगर समाजाच्या विरोधात गेल्यामुळे आरक्षण मिळणं कठीण झालं आहे.

COMMENTS