उस्मानाबाद – धनगर आरक्षणासाठी (अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा) सकल धनगर समाजाच्या वतीने रणशिंग फुकण्यात आले असून तुळजापूर ते चौंडी (जि. अहमदनगर) पदयात्रा काढली जाणार आहे. भाजप सरकार चले जाव चा नारा लावत येत्या 16 ऑगस्टपासून पदयात्रा काढणार असल्याची माहिती समन्वयक सुरेश कांबळे यांनी दिली आहे. उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषदेत गुरुवारी त्यांनी ही
माहिती दिली. 1५ ऑगस्ट 2018 पुर्वी धनगर जमातीस अनुसूचित जमाती (एसटी) चे जात प्रमाणपत्र वितरीत व्हावे व चौंडी प्रकरणातील गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावेत, खोटे आश्वासन देऊन धनगर जमातीची फसवणूक करणार-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तात्काळ फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती च्या वतीने दि.16 ऑगस्ट 2018 ते दि 28 ऑगस्ट 2018 तुळजापुर ते चौंडी अशी 200 कि.मी अंतराची भाजप सरकार चलेजाव यात्रा आयोजित केली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे अॅंड.खंडेराव चौरे आणि राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांना समाज
आरक्षणासाठी पक्षत्याग करणार का ? असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी समाजासाठी आम्ही तयार आहोत, असे सांगितले. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस बाळासाहेब किसवे, रामभाऊ लांडे, किशोर मासाळ, काकासाहेब मारकड, गणेश सोनटक्के, सक्षणा सलगर, अँड खंडेराव चौरे, भारत डोलारे, दत्ता बंडगर, कमलाकर दाणे, अण्णा बंडगर, सुनील पाटील, बालाजी बंडगर, पंडित बंडगर, प्रदिप पाडुळे, देवकर सर, तानाजी सोनटक्के, राजाभाऊ सोनटक्के, किशोर मासाळ, डॉ.राधाकृष्ण लोंढे, सोमनाथ लांडगे, इंद्रजित देवकत, रामभाऊ लांडे उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना कांबले म्हणाले की, सत्तेवर येण्यापुर्वी बारामती येथे चालु असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनात देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यास एक महिन्यात आत आरक्षण देण्याचे कबुल केले होते. परंतु आता आरक्षणाची मागणी केली तर ३०७ सारखे कलम लावून जेल मे डांबले जाते. आजपण डॉ.भिसे या कारणामुळे गेल्या अनेक दिवसापासून जेलमध्ये आहेत. त्यामुळे समाज सध्या पेटुन उठला आहे. १४ संघठनांनी या आंदोलनात भाग घेण्याचे जाहीर केले. तुळजापूर मध्ये जागर घालून आंदोलनास सुरूवात होणार आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी असून चौंडी मध्ये
५ लाख लोक जमतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे.
COMMENTS