बीड : पंकजाताई मी स्वतः त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; स्वतःची व घरच्यांची काळजी घे. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे, असा सल्ला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फोन करून पंकजा मुंडेंना दिला.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ताप, खोकला असून आयोसेलट झाल्याबाबतची त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली होती. हे समजातच त्यांचे बंधू सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना फोन करून तब्येतीची विचारपुस केली आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाडा पिंजून काढला. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्या होम आयसोलाटेड आहेत.
पंकजा मुंडे या आजारी असल्याचे समजताच त्यांना फोन करून तब्येतीची विचारपुस केली.पंकजा मुंडे यांनी कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात, स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोन वरून दिला आहे, तसेच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
Newer Post
विधानपरिषदेसाठी विक्रमी मतदान Older Post
ठाकरे सरकारचा भाजपला दणका
COMMENTS