धुळे – माजी मंत्री आणि नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा फोटो लावून त्यावर ‘अन्याय’ असा फलक झळकवणाऱ्या रिक्षातून एकनाथ खडसे यांनी सफर केली आहे. आपल्यावरील अन्यायाला कार्यकर्त्यांधूनही वाचा फुटत फुटत असल्याचा मार्मिक टोला त्यावेळी खडसे यांनी लगावला आहे. एकनाथ खडसे आज धुळ्याच्या दौ-यावर होते. त्यावेळी एका रिक्षाच्या मागे खडसेंचा फोटो आणि त्यावर अन्याय असे लिहिण्यात आले होते. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी रिक्षातून काही अंतर सफर केली. त्यामुळे एकनाथ खडसेंवरील अन्याय आणि या रिक्षावरील अन्यायाची चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे.
दरम्यान अमळनेर येथील रिक्षाचालक कैलास चौधरी यांनी रिक्षाच्या मागील बाजूला फलक झळकावून एकनाथ खडसे यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. अमळनेरचे कैलास चौधरी यांच्या रिक्षाच्या मागे एकनाथराव खडसे यांचा फोटो आहे. त्याचप्रमाणे ‘अन्याय’ शब्द लिहिला आहे. आमदार एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरून बाजूला केले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षात अन्याय झाल्याची भावना जनमानसात होती. त्याचेच प्रतिबिंब म्हणून कैलास चौधरी यांनी त्यांच्या रिक्षावर फोटो आणि ‘अन्याय’ असे लिहिले आहे.
COMMENTS