मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप खासदार विरुद्ध भाजप आमदार असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. कारण धुळे लोकसभा मतदारसंघातील नाराज भाजप आमदार अनिल गोटे हे लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. याबाबत गोटे यांनी पत्रक काढून उमेदवारीची घोषणा केली आहे. आमदार अनिल गोटे यांची उमेदवारी भाजप खासदार डॉ सुभाष भामरेंच्या विरोधात असल्याचे पत्रकात नमुद करण्यात आले आहे. भाजपचे खासदार डॉ भामरे यांच्यावर आमदार गोटेंनी जहरी टीका केली आहे.
दरम्यान अनिल गोटे यांनी काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या धुळे महापालिकेतही भाजपविरोधात बंड पुकारले होते. परंतु त्यावेळी त्यांना म्हणावं तस यश मिळालं नव्हतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही त्यांनी भाजजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS