दिलीप बराटे पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते !

दिलीप बराटे पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते !

पुणे – महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक दिलीप बराटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दिलीप बराटे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी बराटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मावळते गटनेते चेतन तुपे यांच्याकडे तीन महिन्यांपूर्वी शहराध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी बराटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान बराटे हे वारजे येथून चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. उपमहापौर म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवून नागरिकांच्या हिताची कामे मार्गी लावणार असल्याचं यावेळी बराटे यांनी म्हटलं आहे. या नावासाठी विशाल तांबे आणि दत्ता धनकवडे यांची नावे आघाडीवर होती. मात्र दोघांनाही डावलून बराटे यांना संधी देण्यात आली आहे.

खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीकडे विधानसभेसाठी अनेकज जण इच्छुक आहेत. त्यात बराटे यांचेही नाव आहे. परंतु बराटे यांच्याकडे आता विरोधी पक्षनेते पद दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना डावलले जाणार की त्यांना पक्षाकडून पाठिंबा देण्यात येणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS