राज्यपालांच्या हस्ते दिसले गुरुजींचा सत्कार

राज्यपालांच्या हस्ते दिसले गुरुजींचा सत्कार

मुंबई -सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावला. त्यांच्या कार्याचा गौरव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच इतरही राजकीय पक्षातील लोकांनी केला. त्याचसोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही डिसले गुरूजींचा राजभवन येथे यथोचित सत्कार केला आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. राज्यपाल महोदयांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून काही ट्विट करण्यात आली.

सात कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यपालांनी त्यांचा सत्कार केला. रणजितसिंह डिसले त्यांच्या आई वडिलांसमवेत राजभवनात उपस्थित असल्याची माहिती मिळाली. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी डिसले गुरूजी आणि त्यांचे आई-वडिल यांच्या मनसोक्त गप्पा मारल्या. त्याचा व्हिडीओदेखील ट्विट करण्यात आला आहे. राज्यपाल महोदयांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहीण्यात आले आहे, “जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा आज राजभवन येथे हृद्य सत्कार करण्यात आला. डिसले यांचे अभिनंदन करुन त्यांना शाल व भेटवस्तू देण्यात आली. यावेळी डिसले यांचे आई-वडीलदेखील उपस्थित होते”

COMMENTS