मुंबई – एसटी महामंडळाच्यावतीने शनिवारी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय कृतज्ञता दिन’ सोहळ्यात विविध योजनांचे लोकार्पण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रि फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमादरम्यान यवतमाळच्या आदिवासी महिलांची एसटी चालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या महिला दिवाळीपर्यंत एसटी बस चालवणार आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवकांची एसटी महामंडळाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा रावते यांनी केली आहे.
दरम्यान या कार्यक्रमावेळी एसटीच्या नवीन डिझाईनच्या परिवर्तन बसचे उद्घाटनासोबतच एसटीच्या पहिल्या किफायतशीर (शयनयान) स्लीपर कोच बसचे उद्घाटन करण्यात आलं आहे. तसेच पुण्याच्या स्वारगेट एसटी स्थानकाच्या ठिकाणी अत्याधुनिक मल्टिमोडल बस पोर्ट तयार करणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याठिकाणी मेट्रो, बस आणि इतर वाहतूक सेवा एकत्रित करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच ट्रेनी चालकांना प्रशिक्षणादरम्यान प्रति महिना 400 रुपयांवरुन 2,500 रुपये वाढवण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
COMMENTS