मुंबई – विधान परिषदेत अधिवेशनाच्या शेवटच्या क्षणी गोंधळ पहायला मिळाला. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून हा गोंधळ झाला. परिचारक यांचं निलंबन 9 मार्च 217 ला झाले, 28 फेब्रुवारी 2018 रोजी निलंबन मागे घेण्यात आले होते. मात्र त्यांना सभागृहात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यावरुन हा गोंधळ झाला.
यावेळी परिचारिकांच्या मुद्यावरून सभापतींच्या दालनात येऊन रावतेंनी सभापतींशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घातली होती. त्यानंतर सभापती रामराजे निंबाळकर यांनी परिचारक यांचं निलंबन मागे घेतलं. त्यानंतर रावतेंनी सभापती रामराजे निंबाळकर यांची माफी मागितली.
दरम्यान आज विधान परिषदेचे कामकाज संपत असताना अचानक सभापतींनी प्रशांत परिचारक याचा प्रस्ताव आणला. या प्रस्तावात अनिल परब यांचा परिचारक यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव सद्यस्थितीत राखून ठेवला असून त्याच्या बडतर्फीच्या सूचना स्वीकार्ह नाही असं माझं मत असल्याचं सभापती रामराजे निंबाळकर यांनी म्हटलं. परंतु त्यांना सभागृहात येऊ देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत होईल असं सभापतींनी म्हंटलं.
त्यानंतर सभागृहात अचानक गदारोळ झाला. अनिल परब यांनी दिलेला प्रस्ताव सभापतींनी फेटाळला अशी भावना झाल्याने गदारोळ झाला, आता देश आणि सैनिकबद्दल भावना तीव्र असताना अचानक हा प्रस्ताव आला त्यामुळे विरोधी पक्ष नेते, शिवसेना नेते खवळले. अखेरीस असा कोणताही निर्णय झाला नसून गटनेत्यांच्या बैठकीत प्रशांत परिचारक यांच्याबाबत निर्णय होईल हे मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत स्पष्ट झालं.
COMMENTS