औरंगाबाद – शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात सरकार शिवसेनेमुळेच बनू शकतं नाही तर सरकार बनुच शकत नाही असं असं रावते यांनी म्हटलं आहे. महाशिवआघाडी किंवा युतीचं सरकार असो शिवसेनाच फक्त सरकार बनवू शकते असंही रावते यांनी मेहटलं आहे. रावते यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजप एकत्रित येवू शकते अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सत्तास्थापनेचा सस्पेन्स कायम आहे. अशातच आता दिवाकर रावते यांनी महाशिवआघाडी किंवा युतीचं सरकार असो शिवसेनाच फक्त सरकार बनवू शकते असं म्हटलं आहे. त्यामुळे वेळ पडली तर शिवसेना भाजपसोबतही जाऊन सरकार स्थापन करु शकते असे संकेत रावते यांनी वर्तवले असल्याची चर्चा सुरु आहे.
COMMENTS