मुंबई – एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तीन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.निवृत्त कर्मचा-यांना आम्ही दोन महिन्याचा पास मोफत देत होतो आता ती 6 महिने एवढी वाढवत असल्याचं रावते यांनी म्हटलं आहे. तसेच कर्मचा-यांचे पाल्य जे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी सावित्रीबाईं फुले शिष्यवृत्ती योजना म्हणून प्रती मास 750 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणाही रावते यांनी केली आहे. सध्या सुमारे 33 हजार कर्मचा-यांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे सुमारे 33 कोटींचा भार एसटीवर पडणार असल्याचंही रावते यांनी म्हटलं आहे.
दरम्यान एसटी कर्मचा-यांच्या पाल्याच्या शैक्षणिक खर्चाचा बोझा कामगारांवर येऊ नये यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील अग्रीम योजना सुरू करत असल्याची घोषणाही रावते यांनी केली आहे. या योजनेमुळे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.
कामगार वेतन करार
आत्तापर्यंत झालेले करार एकत्र केले तर त्याच्या दुप्पट वेतन आज जाहीर करत असल्याचं रावते यांनी म्हटलं आहे. आमच्या काळांत 1996 ला करार झाला होता तो 72 कोटींचा होता. नंतरचे सरकार आले असतांना कनिष्ठ वेतन श्रेणी आणण्यास कामगार संघटनांनी मान्यता दिली. काम तेच पगार कमी असे स्वरूप झाले होते. तसेच 2008 ला 17 टक्के तुटपुंजी वेतनवाढ करण्यात आली होती. त्यानतंर 2012 ला फक्कत 13 टक्के वेतनवाढ झाली होती असंही रावते यांनी म्हटलं आहे.
COMMENTS