एसटी कर्मचा-यांसाठी खूशखबर, परिवहनमंत्री दिवाकर रावतेंचा महत्त्वाचा आदेश !

एसटी कर्मचा-यांसाठी खूशखबर, परिवहनमंत्री दिवाकर रावतेंचा महत्त्वाचा आदेश !

मुंबई – राज्यातील एसटी कर्मचा-यांसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कर्मचा-यांची इच्छितस्थळी बदली करण्याचा आदेश रावते यांनी दिला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरापासून इच्छितस्थळी बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाकर रावते यांनी यांसदर्भातील आदेश एसटी महामंडळाला दिले असून याचा फायदा बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या ३,३०७ कर्मचाऱ्यांना होणार आहे.

दरम्यान अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांना ७ जानेवारी २०१९ पर्यंत इच्छितस्थळी पाठवण्याचे आदेश रावते यांनी दिले आहेत.गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून एसटीच्या वाहक-चालकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केले आहेत. परंतु त्यांच्या या अर्जावर अद्याप कार्यवाही करण्यात आली नव्हती. परंतु रावते यांनी आज दिलेल्या या आदेशामुळे या कर्मचा-यांना त्यांच्या इच्छितस्थळी आपली ड्यूटी करता येणार आहे.

 

 

COMMENTS