मुंबई – उद्यापासून म्हणजेच ६ जानेवारीपासून एसटी महामंडळाचे चालक आणि वाहक नव्या गणवेशात दिसणार आहेत. या गणवेशाचं वाटप मुंबईसह राज्यातील ३१ विभागांमध्ये एकाचवेळी केलं जाणार आहे. मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
गेली सत्तर वर्षांपासून एसटीच्या कर्मचा-यांना गणवेशासाठी कापड दिलं जात होतं परंतु हे कापड पसंत न पडल्यामुळे अनेक कर्मचारी आपल्या सोईने कापड विकत घेऊन गणवेश शिवायचे त्यामुळे कर्मचारी एकत्रित आले की गणवेशाचा कलर वेगवेगळा दिसायचा. त्यामुळे कर्मचा-यांना पसंत पडेल असं कापड आणि नवीन डिझाईन तयार करण्याचा निर्णय रावते यांनी घेतला होता. त्यानंतर त्यांनी केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेकडून नवी गणवेश तयार करुन घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षातून दोन तयार गणवेश देण्यात येणार असून शनिवारी दुपारी तीन वाजता मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयात एकाच वेळी हा कार्यक्रम पार पडणार आहे.
COMMENTS