बीडमध्ये शिवभोजन योजनेचा पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभ ! VIDEO

बीडमध्ये शिवभोजन योजनेचा पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभ ! VIDEO

बीड – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘शिवभोजन’ योजनेची सुरुवात आजपासून आहे.पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध भागात ५० ठिकाणी शिवभोजन योजनेचा शुभारंभ रण्यात आला आहे. या शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आला आहे. बीड येथे आज शिवभोजन योजनेचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर हे ही उपस्थित होते.

दरम्यान शिवभोजन योजनेअंतर्गत सुरुवातीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय परिसरात, जिल्हा रुगाणालय, बस स्थानक, रेल्वे परिसर, महानगरपालिका परिसरात एक भोजनालय सुरु करण्यात आले आहेत. शिवभोजन योजनेतील भोजनालय ही दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. या कालावधीत योजनेतील लाभार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ही भोजनालय चालकाची असणार आहे.भोजनालयात एका वेळी किमान २५ व्यक्तींना जेवण्यासाठी बसता यावे अशी व्यवस्था असणार आहे. या एका भोजलनालयात किमान ७५ तर कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध असणार आहे.

 

COMMENTS