गैरसोय होत असल्यास मला फोन करा, धनंजय मुंडेंचा ऊसतोड कामगारांना संदेश! VIDEO

गैरसोय होत असल्यास मला फोन करा, धनंजय मुंडेंचा ऊसतोड कामगारांना संदेश! VIDEO

बीड, परळी – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशाने देशभरात सुरू असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रासह विविध ठिकाणी अडकलेल्या ऊसतोड कामागरांना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संदेश दिला आहे.

ऊसतोडणी साठी बाहेर असलेल्या सर्व कामगारांची सुरक्षा लक्षात घेता त्यांना जिथे आहेत तिथेच ठेवणे त्यांच्यासाठी व त्यांच्या गावातील लोकांसाठी सुरक्षित आहे. त्यानुसार त्या त्या साखर कारखान्याने आहेत तिथेच भोजन, निवास, आरोग्य व सुरक्षा विषयक सोय करणे बंधनकारक आहे. राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी साखर आयुक्तांच्या माध्यमातून याबाबत निर्णय जाहीर केला असून, राज्यातील सर्व सहकारी व खाजगी कारखान्यांना हा निर्णय सक्तीचा आहे.

मात्र बऱ्याच ठिकाणी या निर्णयाबाबत संभ्रम असून काही ठिकाणी कारखान्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याच्या तक्रारी काही ऊसतोड मजुरांनी ना. मुंडे यांच्याकडे केल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंडेंनी एका व्हीडिओच्या माध्यमातून आता साखर कारखाने व ऊसतोड कामगारांना आवाहन केले आहे. तसेच कोणताही कारखाना व्यवस्था करत नसेल तर थेट मला फोन करा असेही मुंडेंनी या व्हीडिओ मध्ये म्हटले आहे.

साखर कारखाना प्रशासनाकडून जर व्यवस्था केली जात नसेल किंवा तत्सम कोणतीही अडचण असेल तर मुंडे यांनी कोणत्याही वेळेला फोन करण्याचे आवाहन केले आहे. मुंडे यांचे स्वीय सहाय्यक श्री. प्रशांत जोशी मो. – 98225 32808 व श्री. खंडू गोरे मो. – 94213 42777 यांनाही संपर्क करण्याबाबत आवाहन केले आहे.

COMMENTS