देशातील पहिलीच घटना, कोरोनामुळे आमदाराचा मृत्यू !

देशातील पहिलीच घटना, कोरोनामुळे आमदाराचा मृत्यू !

मुंबई – कोरोना वायरसमुळे आमदाराचा मृत्यू झाल्याची देशातील पहिलीच घटना समोर आलीय. चेन्नईत कोरोना संसर्गामुळे द्रमुकचे आमदार जे. अंबाजगन यांचा मृत्यू झालाय. ते 62 वर्षांचे होते. एका आठवड्यापूर्वी अंबाजगन यांना कोविड १९चा संसर्ग झाला होता. त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंबाजगन हे चेपाक विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. त्यांना डायबेटिजचा आजारही होता. कोरोना व्हायरसनं एखाद्या आमदाराच्या मृत्यूची देशातील ही पहिली घटना आहे.

कोविड च्या काळात अंबाजगन यांनी कठोर परिश्रम केले, विशेषत: साथीच्या वेळी द्रमुकच्या योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी कष्ट केले परंतु लोकांच्या सेवेच्या वेळी दुर्दैवाने त्यांना लागण झाली. द्रमुक 3 दिवस शोक पाळेल, असं स्टॅलिन यांनी आदेश दिला आहे. स्टालिन यांनी पार्टी केडरला पत्र लिहून पक्षाची सर्व कामे तीन दिवस पुढे ढकलण्यासाठी व पक्षाचा झेंडा अर्ध्यावर आणण्यास सांगितले आहे.

COMMENTS