नवी दिल्ली – दिल्ली विद्यापीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचा झेंडा फडकला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव या तीनही जागांवर एबीव्हीपीनं जिंकल्या आहेत. तर एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. अध्यक्षपदावर अभाविपचे अंकिव्ह बसोया, उपाध्यक्षपदी शक्तीसिंग आणि संयुक्त सचिव पदी ज्योती यादव हे अभिविपचे कार्यकर्ते निवडूण आले आहेत. तर आकाश चौधरी या एनएसयूआयच्या कार्यकर्त्याने सचिवपदाच्या जागेवर विजय मिळवला आहे.
आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. मात्र एनएसयूआय आणि इतर काही विद्यार्थी संघटनांनी ईव्हीएवर आक्षेप घेतला. त्यामुळे दुपारी काही काळ मतमोजणी थांबवण्यात आली होती. मात्र त्यानंतर सर्व विद्यार्थी संघटनांची बैठक झाली आणि त्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली. 2019 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला महत्व आहे. दिल्लीतील तरुण मतदारांचा कल काय आहे हे या निमित्ताने समोर आलं आहे.
COMMENTS