दिल्लीसह उत्तर भारत हादरला असून दिल्ली आणि एनसीआरला भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. उत्तराखंडमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होतं. या भूकंपाचे धक्के दिल्लीसोबतच तामिळनाडूतही जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे धक्के देशभरात अनेक ठिकाणी जाणवले.
या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. जमिनीच्या पृष्ठभागापासून ३० किलोमीटर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असेही हवामान विभागाने सांगितले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे दिल्ली आणि उत्तर भारतातील नागरिक दहशतीखाली आहेत.
COMMENTS