नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांमध्ये ऑललाईन खरेदी करण्याकडे तरुणाईचा कल वाढत आहे. त्यात आता कोरोनाने तर आणखी भर टाकली आहे. वेळेची बचत लांबल लांब रांगेत किंवा गर्दीत घुसायला लागू नये यासाठी ऑनलाईन खरेदीला पसंती दिली जाते. तसंच तुलनेत ऑनलाईन खरेदीमध्ये काही प्रमाणात पैशांचीही बचत होते. त्यामुळे अनेकजण ऑनलाईन खरेदी करत आहेत. त्यातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या यामध्ये उतरल्या आहेत. मात्र कधी कधी अशा ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकांची फसवणू होते. ग्राहकांची ही अडचण समजून केंद्र सरकार ई कॉमर्स कंपन्यांसाठी आता नियमावली आणणार आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यासंदर्भात आज घोषणा करणार आहेत. ही नियमावली आजपासूनच लागू होण्याची शक्यता आहे. ग्राहक संरक्षण अधिनयम 2019 चे नियम आणि कायदे ई कॉमर्स कंपन्यांना लागू होतील. गेल्या 20 तारखेलाचा हा कायदा लागू होणार होता. मात्र आता तो उद्या लागू होईल. ग्राहकांच्या तक्रारीसाठी एका नोडल अधिका-याचीही नियुक्ती होणार आहे. त्या अधिका-याला ग्राहकांच्या तक्रारी ठराविक वेळेत निकाली काढण्याचं बंधन असणार आहे.
लहान आणि मोठ्या अशा सर्व ई कॉमर्स कंपन्यांना हे नियम लागू होणार आहेत. या नियमांमध्ये ग्राहकांची फसवणू झाल्याचं सिद्ध झाल्यास त्याला नुकसान भरपाईबरोबरच कंपन्यांना दंडही ठोठवला जाऊ शकतो. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू खराब असेल किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नसेल तर अशा वेळीही कंपनीवर कारवाई होऊ शकते. या नियमांमध्ये कंपन्यांनी संबंधित वस्तूवर काही हिडन चार्चेस लावले असतील तर त्यालाही चाप लागणार आहे.
COMMENTS