मुंबई – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छगन भुजबळ यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने आरोपपत्र दाखल केलं असल्याची माहिती आहे. नवीन मालमत्ता आणि नवीन आरोपी असल्याचा दाखला देत कप्लेंट फ्रेश(नविन) असल्याचा दावा ईडीनं केला आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान ईडीच्या दाव्याला छगन भुजबळांच्या वकिलांनी विरोध केला असल्याची माहिती असून त्यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहिती आहे. तसेच ईडीनं केलेल्या या दाव्यावर आज कोर्ट निकाल देणार असल्याची माहिती आहे. तसेच कोर्टानं भुजबळांच्या बाजुनं निकाल दिला नाही तर छगन भुजबळ यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS