शरद पवारांना ईडीचं पत्र, “तुमच्या चौकशीची गरज नाही!”

शरद पवारांना ईडीचं पत्र, “तुमच्या चौकशीची गरज नाही!”

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयात चौकशीला सामोरे जाणार होते. पवार यांनी तशी तयारी देखील केली होती. परंतु त्याअगोदरच ईडीने पवार यांना एक ईमेल पाठवला आहे. या ईमेलमध्ये शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी तुमच्या चौकशीची गरज नाही, कदाचित भविष्यातही या चौकशीची गरज पडणार नसल्याचं ईडीनं म्हटलं आहे.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातले कार्यकर्ते जल्लोष साजरा करु लागले आहेत.

दरम्यान शिखर बँकेतील अयोग्य कर्जवाटपाप्रकरणी ‘ईडी’कडून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  त्यामुळे दोन दिवसांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक आज झाले होते. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली . ठाण्यातील पाचपाखडी परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

दरम्यान यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून धरपकड हाेणार या हेतूनेच कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. जर ईडीला बाेलवायचं नव्हतं, तर मग नावं लिक का केली असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. साहेब आपलं म्हणणं मांडण्यासाठी ईडीमध्ये जाणार आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहूल गांधींनी देखील शरद पवारांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. त्यांचं मी स्वागत करताे. खरंच हे सुडाचे राजकारण सुरू आहे. एकनाथ खडसे, संजय राऊत, अण्णा हजारे यांनीही पवारांचे समर्थन केले आहे. यावरूनच त्यांचे निर्दाेषत्व समाेर येते असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काय म्हणालेत राहुल गांधी ?

राहुल गांधी यांनी शरद पवारांविरोधात होत असलेल्या कारवाईवरुन टीका केली आहे. “भाजपाकडून सूडभावनेने लक्ष्य केलेले शरद पवार आणखी एक विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी कारवाई केली जात आहे. सरकारच्या सूडभावनेचा निषेध असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS