मुंबई – आर्थिक गैरव्यहारांप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय. मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भुजबळांची 20 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आतापर्यंत भुजबळांची एकूण 178 कोटी संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे भूजबळ कुटुंब आता संकटात सापडलं आहे.
मंगळवारी सकाळी ईडीच्या अधिका-यांनी भुजबळांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास 20 कोटींची मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. भुजबळांच्या जामीन अर्जावर या आठवड्यात न्यायालय निर्णय देणार आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील कलम ४५ मुळे राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर गदा येते असल्याचं भुजबळांच्या वकीलांनी म्हटलं होतं. त्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.परंतु आता भुजबळांच्या संपत्तीवर कारवाई झाल्यामुळे भुजबळ कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
COMMENTS