“असे दहा खडसे आणि भुजबळ समोर असले तरी लढणारच !”

“असे दहा खडसे आणि भुजबळ समोर असले तरी लढणारच !”

जळगाव – गेल्या दोन वर्षांपासून मी माजी मंत्री छगन भुजबळ, आणि एकनाथ खडसे यांच्याविरोधात लढते आहे, असे दहा खडसे आणि दहा भुजबळ जरी वाट्यात आले तरी आपला लढा संपणार नाही. हिंमत असेल आणि मर्द असाल तर हायकोर्टात आपल्याशी लढा असं आव्हान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ यांना केलं आहे. जळगावमधील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

दरम्यान अंजली दमानिया यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे आणि अंजली दमानिया यांच्यामधील वाद आता टोकाला गेला असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान सहा दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला असून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच दमानिया यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका खोटी असून दमानिया या आपली बदनामी करत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर दमानिया यांनी पुन्हा एकदा खडसेंवर हल्ला केला असून असे दहा खडसे आणि दहा भुजबळ जरी वाट्यात आले तरी आपला लढा संपणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS