मुंबई – भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची आज गळाभेट पहायला मिळाली आहे. विधानभवन परिसरात या दोघांची गळाभेट झाली आहे. अशोक चव्हाण हे कुमार केतकर यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी जात होते. त्यावेळी समोरुन येत असलेले एकनाथ खडसे यांनी चव्हाण यांची थेट गळाभेट घेतली. त्यांच्या या गळाभेटीमुळे राजकीय वर्तुळात सध्या तर्कवितर्क लावले जात असून त्यावेळी काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.
दरम्यान काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार कुमार केतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. गणपतराव देशमुख, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा. जोगेंद्र कवाडे, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम आदी नेते उपस्थित होते.
COMMENTS