त्यामुळे दूर सारलो गेलो, एकनाथ खडसेंनी पुन्हा खदखद बाहेर काढली !

त्यामुळे दूर सारलो गेलो, एकनाथ खडसेंनी पुन्हा खदखद बाहेर काढली !

जळगाव  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिपद सोडावं लागल्यामुळे अनेकवेळा त्यांनी भाजपवरील नाराजी जाहीर बोलून दाखवली आहे. अनेकवेळा त्यांनी भाजपवर जाहीर टीकाही केली. खडसे यांनी पुन्हा एकदा आपली खदखद बाहेर काढली आहे. मंत्री नाही म्हणून गेल्या दोन वर्षात सगळं बिघडलंय. आपण फटकळ बोलतो त्यामुळं दूर सारलो गेलो असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड येथे परिसरातील बूथ समिती प्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच मंत्री नसलो तरी काही फरक पडत नाही. खुर्चीचे आपण भुकेले नाहीत, लोकांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून रस्त्यांबाबत तक्रार करू असं आश्वासनही यावेळी खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना यावेळी दिलं आहे.

COMMENTS