ईडीला उत्तर देईन नंतर सीडीचं बघू – एकनाथ खडसे

ईडीला उत्तर देईन नंतर सीडीचं बघू – एकनाथ खडसे

मुंबई – मी ईडीला नक्कीच सामोरे जाईल. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देईन. सीडीचं नंतर बघू, म्हणतं राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ईडीकडून आलेल्या चौकशीच्या नोटिसाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

खडसे म्हणाले, ३० तारखेला मला बोलावण्यात आलं आहे. मी ईडीला नक्कीच सामोरा जाणार आहे. या आधी माझी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभाग अशी अनेक विभागांमार्फत आतापर्यंत चार वेळा चौकशी झाली आहे. यावेळीही मी चौकशीला सामोरा जाणार आहे. “आता मी ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देईन. CDचं नंतर बघू. भोसरीच्या भूखंड प्रकरणी ही माझी पाचव्यांदा चौकशी होत आहे. तो भूखंड मी विकत घेतलेला नसून तो माझ्या पत्नीच्या नावाने खरेदी करण्यात आला आहे. त्या ठिकाणचा व्यवहार हा रेडीरेकनरच्या दराप्रमाणे ५ कोटींचा आहे. याप्रकरणी चौकशी होत आहे. आणखी चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीकडून जी काही सूचना येईल, त्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्र मी सादर करेन”, असेही ते म्हणाले.

 

COMMENTS