मुंबई – माझ्या जीवनात एकही निवडणूक मी हरलो नाही. 40 वर्षात एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आरोप, प्रत्यारोप सभागृहात होतच असतात. पण विरोधी पक्षनेता म्हणून मी कायम पुराव्यांसह आरोप केले. कारण बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात हे मला माहिती आहे. विधानसभेतल्या 288 आमदारांपैकी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी आज उभा आहे अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान एकनाथ खडसे यांच्या मनातली खदखद पुन्हा एकदा बाहेर पडली आहे. आज सभागृहात बोलत असताना त्यांनी आपल्यावर आन्याय झाला असल्याचं म्हटलं आहे. सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही नाही, पण बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केलेत. दाऊदच्या बायकोशी माझे बोलण्याचे संबंध जोडले गेले. दाऊदला सोडून तिला नाथाभाऊंशी का बोलावं वाटलं हे मला कळलंच नाही. एटीएस आणि इतर यंत्रणांनी केलेल्या चौकशीत काहीच सिद्ध झाले नाही. याचं मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही बरं वाटलं. मात्र नुकसान जे व्हायचं होतं ते होऊन गेलं असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS