नाराज असलेले एकनाथ खडसे दिल्लीत !

नाराज असलेले एकनाथ खडसे दिल्लीत !

नवी दिल्ली – नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आज दिल्लीत गेले आहेत. एकनाथ खडसे यांनी आज दिल्ली जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. आज सकाळी दहा वाजता खडसे यांनी गडकरींची भेट घेतली असून दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे.

पुण्याजवळच्या  भोसरीतील जमिनी खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा आरोपावरुन एकनाथ खडसे यांचं मंत्रिपद गेलं आहे. आपल्यावर झालेले सर्व आरोप खोटे असल्याचं एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिपद मिळवण्यासाठी एकनाथ खडसेंची धडपड सुरु आहे. आज याच मुद्द्यावरुन खडसे यांनी गडकरींची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS