सभागृहात नालायक, अक्कल नाही का ? असं बोललो की मुख्यमंत्रीही दचकायचे – एकनाथ खडसे

सभागृहात नालायक, अक्कल नाही का ? असं बोललो की मुख्यमंत्रीही दचकायचे – एकनाथ खडसे

जळगाव –  आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचंच सरकार येणार असल्याचा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. भुसावळ येथे लोणारी मंगल कार्यालयात आज बुथप्रमुख आणि शक्ती केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षात असतानाच्या काही आठवणींनाही उजाळा दिला.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वर्मावर बोट ठेवायचं असेल तर मी त्यांना नालायक म्हणायचो. मी अनेक वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या वर्मावर बोट ठेवायचं असेल तर मी काही विषय मांडायचो, मी थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत असे. विलासराव मुख्यमंत्री होते, त्यांच्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. पण मी बोलत असताना अशोक चव्हाण उभे राहिले की त्यावेळी कागद घ्यायचो आणि विचारायचो याचं काय झालं? नालायक, अक्कल नाही का? असं म्हणायचो. हे ऐकताच मुख्यमंत्रीही दचकायचे. एवढा तापट माणूस काय विचारतो आहे. त्यांची हिंमतही होत नव्हती मला जाब विचारण्याची की मी नालायक शब्द का वापरतोय. मला नालायक शब्द मागे घेण्याची विनंती केली जायची. मग मी तो मागे घ्यायचो पण सुरुवात आक्रमकच करायचो असंही यावेळी खडसे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS