मुंबई – एकनाथ खडसे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश झाला. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार या सोहळ्याला उपस्थित नव्हते. यावेळी खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले. खडसे यांनी आपल्या भाषणात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे.बाईला समोर ठेऊन कधीच राजकारण केलं नाही, समोर गोड बोलायचं आणि पाठीत खंजीर खपसायचा असं काम आपल्याला कधी जमलं नाही परंतु माझ्या मात्र पाठीत खंजीर खुपसण्यात आला. ज्याप्रमाणे भाजपमध्ये निष्ठेनं काम केलं त्याप्रमाणेच राष्ट्रवादीत करणार असल्याचा शब्द मी पवार साहेबांना देतो असंही खडसे म्हणाले.
— NCP (@NCPspeaks) October 23, 2020
दरम्यान कार्यकर्त्यांची भावना होती, म्हणून मी राष्ट्रवादीत आलो. नाथाभाऊची ताकद काय आहे, हे जळगावात दाखवून देऊ. भाजप ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू, राष्ट्रवादीत प्रवेश करुन डोक्यावरचं वजन कमी उतरलं, हलकं हलकं वाटतंय. संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की माझा किती छळ झाला, माझ्यावर अन्याय झाला. मी विधानसभेतही विचारलं की माझा गुन्हा काय? जर माझा काही गुन्हा असेल तर त्याचे कागदपत्र दाखवा असंही खडसे यांनी म्हटलं आहे.
आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते श्री. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Posted by Nationalist Congress Party – NCP on Friday, October 23, 2020
COMMENTS