मुंबई – भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. खडसे यांनी विधानभवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा झाली. या भेटीनंतर आपण नाराज नसून मी नाराज असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं मत खडसे यांनी व्यक्त केलं आहे. मी नाराज नाही. मी नाराज आहे ही बातमी चुकीची आहे. माझी मनधरणी करण्यासाठी कुणी आलं यामध्येही तथ्य नाही. ते आले की राजकीय चर्चा होते. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक नेत्यांशी माझी ओळख असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान 12 डिसेंबररोजू गोपीनाथ गडावर स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरवर्षी आम्ही या गडावर असतो. आताही आम्ही उपस्थित राहणार आहोत. मी मंत्री असताना 5 वर्षापूर्वी औरंगाबादला गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभं करावं यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. मात्र, अद्यापही ते काम झालेलं नाही. उद्धव ठाकरेंना मी हे स्मारक करण्याची विनंती केली असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांना गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाबाबतची घोषणा त्यांनी स्वतः करावी, अशीही विनंती केल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.
COMMENTS