अजित पवार यांच्याविरोधात असलेले बैलगाडीवर पुरावे आम्ही रद्दीत विकले – एकनाथ खडसे

अजित पवार यांच्याविरोधात असलेले बैलगाडीवर पुरावे आम्ही रद्दीत विकले – एकनाथ खडसे

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा स्वपक्षावर तोफ डागली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये हेतूपुरस्पर मला चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि इतर काहीजणांना प्रचाराच्या दरम्यान बाहेर ठेवण्यात आलं त्याच्यामुळे निश्चितच त्याचा फटका पक्षाला पडला तर आम्हाला सोबत घेऊन चालले असते तर वीस पंचवीस जागांचा फरक निश्चितच पडला असता असं खडसे यांनी म्हटलं आहे. याचा जाब आम्ही वेळोवेळी पक्षाला विचारलेला आहे वरिष्ठांना विचारलेला आहे असंही खडसे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्याविरोधात असलेले बैलगाडीवर पुरावे आम्ही रद्दीत विकलेले आहेत असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

दरम्यान सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करीत असलेल्या राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याप्रकरणी उघड चौकशीची नऊ प्रकरणे बंद करण्यास मंजुरी दिली आहे. ही सर्व प्रकरणे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित नसल्याचा दावा ‘एसीबी’ने केला आहे.

यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याच्या नऊ प्रकरणात क्‍लिन चिट दिली. हा केवळे योगायोग आहे की, जाणीवपूर्वक केलेले आहे. अशी शंका जनतेच्या मनात येणं स्वाभाविक आहे. कारण आज राजकारणावरचा जनतेचा विश्‍वास उडाला आहे,” अशी उपरोधिक टीका एकनाथ खडसे यांनी काल केली होती. त्यानंतर आज त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात असलेले बैलगाडीवर पुरावे आम्ही रद्दीत विकलेले आहेत असं म्हटलं आहे.

COMMENTS