…तर राजकारणातून निवृत्त होईन – एकनाथ खडसे

…तर राजकारणातून निवृत्त होईन – एकनाथ खडसे

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. मी काय गुन्हा केला हे सांगा ? मी गुन्हा केला असेल तर राजकारणातून निवृत्त होईन असं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. तुमचा मंत्री आणि तुमच्या मनातील नाथाभाऊ मीच असल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे. न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे संस्थेच्या सभागृहात चौथ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान मी राजकारणातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारा विरोधात लढा दिला. तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे, हे कोणी पहात नसल्याचही यावेळी खडसे यांनी म्हटलं आहे. मागील ४० वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही. या काळात संघर्ष करीत पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले तसेच गुन्हेगारी विरोधात लढा देऊनही माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण झाल्याचे संबंध जोडले गेले. ते खरे की खोटे हे कोणी पहात नाही. त्यामुळे ही खंत मी वारंवार बोलून दाखविणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS