मुंबई – भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: फडणवीस यांनी दिली असून माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली असल्याचं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी असें ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020
दरम्यान फडणवीस यांना नेमकी कोरोनाची लागण कोठून झाली याबाबत अद्याप माहिती नाही. देवेंद्र फडणवीस हे सध्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर आहेत. मात्र, गेल्या 4 दिवसांपासून ते महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेकजण आले होते. संपर्कात आलेल्या नागरिकांना काळजी घेत, कोरोना चाचणी करावी, असे आवाहन स्वत: फडणवीस यांनी केले आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी.
सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020
फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळताच त्यांनी नुकतेच राष्ट्रवादीमध्ये गेलेले आणि फडणवीस यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे नाशिकमध्ये पोहोचले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी फडणवीसांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मी टीव्हीवर फडणवीसांना करोना झाल्याचं पाहिलं. त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS