मोदी लाट ओसरली काय ? या प्रश्नाला खडसेंचं उत्तर !

मोदी लाट ओसरली काय ? या प्रश्नाला खडसेंचं उत्तर !

मुंबई – तीन राज्यांतील निवडणुकांमधील पिछेहाटीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्याही निवडणुकांमधील विजय किंवा पराजयाचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनावर होत असतो. त्यामुळे महाराष्ट्रात त्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील. मात्र, महाराष्ट्रात सरकार विरोधात नाराजीचा परिणाम निवडणुकांमध्ये होणार नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

मोदी लाट ओसरली काय याबाबत विचारलं असता “लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी विकासाच्या नावावर मतं मागितली होती. आज निवडणुका झालेल्या तिन्ही राज्यांत विकास झाला हे मतदारही मान्य करतात. मात्र, शेवटी मतदार राजा आहे. कुणाला मत द्यायचं कुणाला नाही हा त्याचा अधिकार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशात पंधरा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. या राज्यांत भाजप विकास कामांबाबत अग्रेसर राहिला हे मान्य करावं लागेल. अर्थात पंधरा वर्षांनंतर सरकार विरोधातील नाराजीचा फटका बसू शकतो. याबाबत आत्मचिंतन करावं लागणार असल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS