राज्य सरकार अल्पसंख्यांकांच्या विरोधी, एकनाथ खडसेंचा घणाघात !

राज्य सरकार अल्पसंख्यांकांच्या विरोधी, एकनाथ खडसेंचा घणाघात !

मुंबई – भाजपवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधी असून अल्पसंख्याकांकडे सरकारनं दुर्लक्ष केला असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. तसेच हे सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधात असून यांच्या मनात अल्पसंख्याकांसाठी काय भावना आहेत हे ओळखू येत असल्याचंही खडसे यांनी विधानसभेत म्हटलं आहे.

दरम्यान या विभागाच्या निधीसाठी सर्वत्र फिरलो मात्र त्यांना सरकारनं निधी दिला नाही अल्पसंख्याक विभागाच्या संदर्भात गेले तीन वर्षांपूर्वी पहिले पॉलिटेक्निक माझ्या मतदारसंघात सुरू केलं. जागा दिली, टेंडर काढले मात्र निधीची तरतूद नाही, त्यामुळे हे विद्यालय होऊ शकले नाही. तसेच त्यांना स्कॉलरशिपची व्यवस्था केली मात्र किती विद्यार्थ्यांना दिली ?, १० टक्के विद्यार्थ्यांनाही मिळाली नाही असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं असून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना तातडीने स्कॉलसरशीप देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच उगाच आशेवर ठेवायचं बंद करा, ते आशेनं तरी पाहणार नाहीत . त्यामुळे सभागृहातच सांगा या मागण्या मान्य होणार आहेत की नाही अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.

COMMENTS