मुंबई – पाण्यासाठी माझ्यावर भीक मागण्याची वेळ आली असल्याचं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. विधानसभेत बोलत असताना खडसे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही, वीजबिल भरलं नाही म्हणून वीज कापली जात आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचं वीज कनेक्शन कापू नये अशी मागणी खडसे यांनी केली आहे.तसेच मी आंदोलन करायच्या तयारीत आहे. मी सर्वांना भेटलो पण माझ्या मतदारसंघात पाणी मिळत नाही.पाण्यासाठी माझ्यावर भीक मागण्याची वेळ आली असल्याचं खडसे य़ांनी मेहटलं आहे.
तसेच पाणी प्यायला मिळत नाही अशी परिस्थिती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या पाणी योजनेचे अधिकार द्या. चाऱ्याची टंचाई आगामी काळात भासण्याची शक्यता आहे . त्यामुळे चाऱ्याला जिल्हाबंदी करण्याची मागणी खडसे यांनी केली आहे.
दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असायला हवे. पण आज प्रशासनाकडे स्टाफ कमी आहे.
आमच्यासारखा माणूस 3 महिने पत्रव्यवहार करत आहे. माझी ही स्थिती आहे. हे सरकार दुष्काळाचा पोरखेळ तर करत नाही ना? असा सवालही खडसेंनी केला आहे.
तुमच्याकडे माणसंच नाही तर तुम्ही काय दुष्काळावर मात करणार.आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पण दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. आज माझ्या मतदारसंघात 81 गावामध्ये वीज बिलं भरली नाहीत.
पाणी मिळत नाही.
याबाबत मी सभापतींना पत्र देणार आहे. की मला आता पायऱ्यांवर बसण्याची परवानगी द्या.मी क्लेकटर ऑफिसला ही बाब सांगितली, चंद्रकात पाटील यांना देखील याबाबत सांगितले मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे जायचे कुठे ? ज्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ येते तेव्हा जनावरांची काय स्थिती आहे असंही यावेळी खडसेंनी म्हटलं आहे.
COMMENTS