एकनाथ खडसेंचे थेट गृहमंत्रालयावर आरोप !

एकनाथ खडसेंचे थेट गृहमंत्रालयावर आरोप !

नागपूर – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी थेट गृहमंत्रालयावर आरोप केले आहेत. मी ४० वर्ष सार्वजनिक जीवनात काम करत आहे. यामधील ३८ वर्ष माझ्यावर एकही आरोप झाला नाही परंतु या दोन वर्षातच असे का घडत आहे. असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच माझे जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला असून मी स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेलो पण पोलीसांनी एफआयआर घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान यापूर्वी माझ्या नावे 9.5 कोटी आणि 10 कोटीचे बनावट धनादेश काढले गेले. त्याबाबत मी तक्रार करायला गेलो तर पोलीसांनी एफआयआर दाखल केले नाही. त्यानंतर मी त्याबाबत कोर्टात गेलो़, कोर्टाच्या आदेशाने यात चौकशी होऊन आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळे माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS