लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य !

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला घाणेरड्या राजकारणाचा वीट आलाय म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे.  मी परिस्थितीला दोष देत नाही, कदाचित माझंही चुकलं असेल. पण शनीची साडेसाती लागल्याचे सांगत शनी कोण आहे याबद्दल माहिती असल्याचेही खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच विधानसभा लढवण्याबाबत अजून ठरवलं नसून सत्ताधाऱ्यांमध्ये दु:ख केवळ माझ्याच वाट्याला आली असं दु:खही त्यांनी व्यक्त केलं आहे.

लोकसभेत भाजपला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात येतील याकडे आमचे सध्या लक्ष आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करेल. विधानसभा जवळ आल्यावर त्या लढवायच्या की नाही हा विचार त्यावेळी घेईन. ज्या व्यक्तीने 40 वर्षे भाजपाच्या वाढीसाठी प्रयत्न केला. अस असताना त्याच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. त्यात कोणतेही तथ्य नव्हते. असा प्रसंग कोणावर येऊ नये. हे मला क्लेशदायक वाटते, असही खडसे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS