मंत्रालयात उंदीर घोटाळा, धर्मा पाटलांचा मृत्यूही उंदरांच्या औषधामुळेच – एकनाथ खडसे

मंत्रालयात उंदीर घोटाळा, धर्मा पाटलांचा मृत्यूही उंदरांच्या औषधामुळेच – एकनाथ खडसे

मुंबई – पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत आज गौप्यस्फोट केला आहे. मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा झाला असून शेतकरी धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नाही तर मंत्रालयातीलच उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केला असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आले. 6 महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं. मात्र 7 दिवसांतरच सर्व उंदीर मारले असल्याचं सांगण्यात आलं. दिवसाला 45 हजार उंदीर मारल्याचं सांगितलं. पण या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नसल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

दरम्यान कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवाना नव्हता तरीही या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट का दिले असा सवाल खडसे यांनी केला आहे. तसेच धर्मा पाटील यांच्या मृत्यूबाबतही त्यांनी गौप्यस्फोट केला असून मंत्रलायत विष आणण्यास परवानगी नाही. त्यामुळे धर्मा पाटील यांनी बाहेरुन विष आणलं नव्हतं. ते त्यांनी मंत्रलयात असलेलं उंदीर मारण्याचं विष घेतलं असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच उंदीर मारण्याच्या या कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा घोटाळा झाला असून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

 

COMMENTS