शरद पवारांवरील कारवाईबाबत एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट!

शरद पवारांवरील कारवाईबाबत एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट!

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील शरद पवार यांची पाठराखण केली आहे. मी विरोधी पक्षनेता असल्यापासून विधानसभेत राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केला आहे. सुरुवातीपासून या गैरव्यवहारात कुठेही शरद पवार यांचे नाव नव्हते, हे मी जबाबदारीने सांगू शकतो. त्यामुळे आता अचानक गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव कसे पुढे आले. असा सवाल खडसेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान सरकारकडून जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आल्याचा अप्रत्यक्ष आरोप पवार यांनी केला आहे. ईडीच्या कार्यालयाला मी स्वत:च जाऊन भेट देणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. माझ्या आयुष्यातील हा दुसरा प्रसंग आहे. एकदा 1980 साली शेतकरी प्रश्नावर दिंडी काढली होती तेव्हा जळगावमध्ये माझ्यावर खटला दाखल केला होता. आता ईडीने माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जी शोध घेणारी यंत्रणा आहे तिला पूर्ण सहकार्य करायचं अशी माझी भूमिका आहे. आता संपूर्ण एक महिना निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार आहे.

त्यामुळे मी मुंबईबाहेर राहणार आहे. त्यामुळे ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि मी उपलब्ध नाही असे व्हायला नको. दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हा इतिहास आहे. मी संविधान मानणारा आहे. म्हणून 27 सप्टेंबरला मी दुपारी दोन वाजता मी ईडीच्या ऑफीसला जाणार आहे आणि त्यांना संपूर्ण माहिती देणार आहे. आणि त्यांचा काही पाहुणचार असेल तर तोही घेणार आहे असं पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS