सरकारला 4 वर्ष पूर्ण, एकनाथ खडसेंनी व्यक्त केली ‘ही’ खंत !

सरकारला 4 वर्ष पूर्ण, एकनाथ खडसेंनी व्यक्त केली ‘ही’ खंत !

नंदूरबार – एकनाथ खडसे याना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याची सल कायम असल्याचं आज पुन्हा एकदा दिसून आलं आहे. सरकारला 4 वर्ष पूर्ण होत असताना त्यावेळी शपथ घेतलेला मी एकमेव मंत्री आज मंत्रिमंडळ बाहेर असल्याची खंत खडसे यांनी व्यक्त केली आहे. मी भ्रष्टाचार केला असेल जर तसे चौकशी अहवालात स्पष्ट झालं असेल तर जनतेला सांगा नाही तर मला बाहेर का काढलं? याचं उत्तर द्या असं एकनाथ खडसे यांची जाहीर सभेतून मुख्यमंत्र्यांना विचारलं आहे. शहादा तालुक्यातील सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम कार्यक्रम सभेत ते बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलत असताना खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा बोचरी टीका केली आहे. नंदूरबारमधील शासकीय उपसा सिंचन योजना 4 वर्षांपासून सुरू होत नाही. याला जलसंपदा मंत्री आणि खाते जबाबदार आहे का ? असा प्रश्न विचारला असता खडसे यांनी नाही नाही शासन जबाबदार वैगरे काही नाही 4 वर्षांपासून यावर अभ्यास सुरू असल्याची बोचरी टीका महाजन यांच्यावर केली आहे.

मंत्रिमंडळामध्ये पुन्हा सामील होण्याबाबत खडसेंना विचारलं असता याबाबत मुख्यमंत्र्यांनाच विचारा माझ्याबाबतचा निर्णय मीच कसा घेऊ. सरकारला 4 वर्ष पूर्ण होत असताना आमचे पण अच्छे दिन येतील अशी आशा खडसे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS