मुंबई – गेली काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. काल एकनाथ खडसेंनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर संजय राऊत यांनीही खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात असतात, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे खडसे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करुन महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये प्रवेश करून मंत्रिपद मिळवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान एकनाथ खडसे हे गेली अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. खडसे यांनी काल पक्षाला घरचा आहेर दिला होता.विधानसभा निवडणुकीमध्ये हेतूपुरस्पर मला चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि इतर काहीजणांना प्रचाराच्या दरम्यान बाहेर ठेवण्यात आलं त्याच्यामुळे निश्चितच त्याचा फटका पक्षाला पडला तर आम्हाला सोबत घेऊन चालले असते तर वीस पंचवीस जागांचा फरक निश्चितच पडला असता असं खडसे यांनी म्हटलं आहे. याचा जाब आम्ही वेळोवेळी पक्षाला विचारलेला आहे वरिष्ठांना विचारलेला आहे असंही खडसे काल म्हणाले होते. अजित पवार यांच्याविरोधात असलेले बैलगाडीवर पुरावे आम्ही रद्दीत विकलेले आहेत असंही एकनाथ खडसे म्हणाले होते. त्यानंतर संजय राऊत यांनीही खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात असतात, असं वक्तव्य केलं होतं.त्यामुळे ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील असं बोललं जात आहे.
COMMENTS