जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे.भाजपमधील घरभेद्यांवर कारवाई करा अन्यथा आपण 5 दिवसांमध्ये पक्षांतर करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.तसेच आपल्याला इतर तिन्ही प्रमुख पक्षांकडून निमंत्रण आल्याचंही खडसे म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांची थेट पक्षाला इशारा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे एकनाथ खडसे काय निर्णय घेणार. तसेच त्यांच्या इशाय्राची पक्ष दखल घेणार का हे पाहण गरजेचं आहे.
दरम्यान नागपूर येथे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त भेट घेतली असल्याची चर्चा आहे. शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची अज्ञातस्थळी भेट झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे जळगावातील मुक्ताईनगरमधील एकनाथ खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचं चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले फलक काढल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे खडसे भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली होती. परंतु याबाबत अजून खडसे यांनी कोणताही निर्णय घेतला नसून भाजपमधील घरभेद्यांवर कारवाई करा अन्यथा आपण 5 दिवसांमध्ये पक्षांतर करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS