पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी केलं मोठं वक्तव्य!

पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी केलं मोठं वक्तव्य!

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. भाजपने ओबीसी नेत्यांना डावललं, एकतर त्यांना तिकीट दिलं नाही आणि ज्यांना तिकीट दिलं त्यांना भाजपमधील गटाने पाडलं असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. जे यशाचं श्रेय घेतात, त्यांनी पराभवाचं पण घ्यावं, ज्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी ती जबाबदारी घ्यावी असं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

दरम्यान पक्षाविरोधी कामं करणाऱ्यांची नावं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवली आहेत, त्यांनी चौकशी करुन विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करावी. जे घडलं आहे, पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे ती मी वरिष्ठांना कळवली आहे. तसेच कोणत्याही सरकारचं किंवा विरोधकांच्या कामकाजाचं मूल्यांकन केवळ 8 दिवसात करता येणार नसल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS