मुंबई- काल(23 जून) पासून देशात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी जोरदार सुरू झाली आहे. प्लास्टिक हाताळणाऱ्या अनेकांना दंड ही ठोठावण्यात आले. परंतु आज चक्क मंत्री महोदयच प्लास्टिक बंदीच्या नियमांचा उलंघन करताना दिसुन आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात काही मान्यवरांच आणि निवडणूकित पाठिंबा जाहीर करणाऱ्या नेत्यांचा स्वागत प्लास्टिक गुंडाळलेल्या बुके ने केलं आहे. त्यामुळे जबाबदार मंत्र्यांकडूनच नियमांची पायमल्ली होताना दिसून आली.
दरम्यान याबद्दल एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर उत्तर न देता पत्रकार परिषदेतुन उठून जान पसंत केलं.
शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री यांनी पुढाकार घेऊन प्लास्टिक बंदी साठी प्रयत्न केले होते. आता त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून प्लास्टिक बुकेचा वापर केला गेला त्यामुळे या मंत्री महोदयांकडून दंड वसूल केला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
COMMENTS