मुंबई – कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलेल्या मागणीला सर्व मंत्र्यांनी सहमती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. मागील वर्षी मंत्रीमंडळ बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. देशात पहिल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावं असं शिवसेनेनं म्हटलं होतं. त्यानंतर नावाचा वाद निर्माण झाला होता. परंतु महाविकासआघाडीचं सरकार
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील 710 किमी अंतराचा प्रवास या महामार्गामुळे फक्त 6 तासात होणार आहे. यासाठी सुमारे 56 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. तीन वर्षात महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातील 27 तालुक्यातल्या 350 गावांमधून जाणार आहे.
या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावं असा प्रस्ताव भाजपने दिला होता. आता त्याऐवजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला देण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्यामुळे महामार्गाचे काम गतीने सुरू नसले तरी त्याच्या नावावरून वातावरण तापत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS