खडसेंना सध्या कामही नाही – दरेकरांची टिका

खडसेंना सध्या कामही नाही – दरेकरांची टिका

मुंबई – भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांनी प्रकरणी पत्रकार परिषद घेतल्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट् विट करून “मला वाटतं खडसेंना सध्या कामही नाही आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर आपण भाजपवर आरोप करतोय आणि काही प्रकरणे उकरून काढतोय, हेच दाखवण्यासाठी एकनाथ खडसे धडपड करत आहेत!” असं म्हणत खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या नऊ राज्यात शाखा असून ११०० कोटींची मालमत्ता मातीमोल भावात विकली गेल्याचा दावा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

या संदर्भात ट्विटरवर एका व्हिडिओद्वारे दरेकर यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, “जी गोष्ट चौकशीत आहे त्यावर निष्कर्ष येईल. मला खडसेंना विचारायचं आहे, राज्य सरकारी बँकेने कारखाने जे लिलावात काढले आहेत, ५०० कोटींचे कारखाने १० ते १५ कोटींना विकले. त्याची चौकशी करा. बुलडाणा अर्बन बँक, वर्धा बँक, नागपूर बँक असेल अख्ख्या बँकाच्या बँका डुबवल्या आहेत. राज्य सरकारी बँकेने त्या ठिकाणी कर्ज दिलं आहे, जिथं केवळ जागा आहे प्रकल्प देखील नाही. अशा प्रकल्पांना कर्ज दिलं आहे. मला वाटतं राज्यातील सर्व बँका, पतसंस्था कुठल्याही पक्षाच्या असू द्या ज्यांंचे ज्यांचे घोटाळे आहेत, त्यांची एकादाच काय ते सर्व चौकशी लावा आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर येऊ द्या.”अशीही मागणी केली

COMMENTS