मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश निवडणूक आयोगानं दिला आहे. मुंडे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहिरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. तपासात तसं सिद्ध झालं आहे. त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरमाना प्रसिद्ध करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या बी 4 या सरकारी बंगल्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आचारसंहिता लागू असताना सरकारी मालमत्तेचा वापर करता येत नाही. त्यामुळेच आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीविरोधात तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने यासंबंधी चौकशीचे आदेश दिले होते. तपासाअंती सरकारी बंगल्याचा गैरवापर केल्याचं निष्पन्न झालं असल्याची माहिती निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली आहे.
COMMENTS