मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दुसय्रा पक्षातून आलेल्या काही नेत्यांना युतीकडून उमेदवारी देण्यात आली. या नाराजीवरुन भाजप-शिवसेनेतील काही नेत्यांनी बंडखोरी केली. बंडखोरांमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तब्बल 14 बंडखोरांचा पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या विरुद्ध बंडखोरी करणाय्रा तब्बल 14 शिवसेना पदाधिकाय्रांचीही हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कठोर कारवाई करत बंडखोरी करणाय्रांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
शिवसेनेतील या बंडखोर नेत्यांची हकालपट्टी
प्रकाश कौडगे – नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ
बाबूराव कदम कोहळीकर – हदगाव विधानसभा
महेश कोठे – सोलापूर मध्य
मनोज शेजवळ – मोहोळ विधानसभा
कैलास पाटील व इंदिरा पाटील – चोपडा विधानसभा
आण्णासाहेब माने व संतोष माने – गंगापूर विधानसभा
विजयराज शिंदे,सिंधुताई खेडेकर, अर्जून दांडगे -बुलडाणा विधानसभा
अनिरुद्ध रेडेकर, चंदगड विधानसभा
कमलाकर जगदाळे, दुर्गेस लिंगराज – कोल्हापूर उत्तर विधानसभा
संदीप दगडे -हातकणंगले विधानसभा
शानाभाऊ सोनवणे – सिंदखेडा विधानसभा
राम पाटील – जिंतूर विधानसभा
डॉ. संजय कच्छवे – पाथरी विधानसभा
ऍड. विशील होबळे – क्ज विधानसभा
दरम्यान आघाडीतलही काही नेत्यांनी बंडखोरी केली आहे. परंतु सर्वात जास्त बंडखोरीचा फटका भाजप-शिवसेनेला बसला असून आता या दोन्ही पक्षातील ज्येष्ठांनी काही बंडखोरांवर कारवाई केली आहे. भाजपनेही काही बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे.
भाजपच्या या बंडखोर नेत्यांवर कारवाई
पिंपरी चिंचवड मनपातील भाजप नगरसेविका सीमा सावळे
महेश बालदी, उरण, रायगड
अतुल देशमुख, खेड, आळंदी
संजय देशमुख, दिग्रस, यवतमाळ
धनराज मुंगले, चिमूर
राजकुमार नाचणे, मुर्तिजापूर
किशोर पवार, कन्नड, औरंगाबाद
अयोध्या अशोक केंद्रे, किनगाव, लातूर
दिलीप राजेसाहेब देशमुख, लातूर
चरण वाघमारे, तुमसर
गीता जैन – मीरा-भाईंदर
बाळासाहेब ओव्हाळ – पिंपरी-चिंचवड
दरम्यान या यादीवरुन पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, गुहागर यासह विदर्भ आणि मराठवाड्यातीलही अनेक जागांवर युतीतील नाराज नेत्यांनी बंडाचं अस्त्र उगारलं आहे. त्यामुळे बंडखोर नेते भाजप-शिवसेनेचं गणित बिघडवणार का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
COMMENTS